Ad will apear here
Next
अभ्यास कौशल्ये
विद्यार्थीदशेत अभ्यास हा करावाच लागतो. त्यावरच पुढील आयुष्याची गणिते ठरत असतात. पण हे कळण्याचे वय नसल्याने अभ्यासाचा कंटाळा, कटकट वाटत असते. असे वाटू नये म्हणून अभ्यास कसा करावा, 'अभ्यास' कौशल्यांची गरज व ती कोणती आहेत. काळाचे भान ठेवून केलेला अभ्यास, त्यातून मिळणारे यश या सर्व गोष्टींची चर्चा प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी अभ्यास कौशल्ये एक पाउल पुढे.... या पुस्तकात केली आहे.

प्रथम अभ्यास कौशल्ये का व कशासाठी हे उदाहरणे देऊन सांगितले आहे. अभ्यास कौशल्य प्रशिक्षण कसे घ्यावे, त्यातून मिळालेला बोध व शोध, अध्ययन व अभ्यास कौशल्यांची वर्गवारी, अभ्यास पद्धत (SQ3R),वेळापत्रक नियोजनाचे महत्व, एकाग्रस्ता कौशल्य, वाचन कौशल्य, कल्पनांचे संघटन, टिपण कौशल्य, स्मरण कौशल्य आत्मसात कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे.

पाचवी सहावीपासून महाविद्यालयीन विद्यार्थी अध्ययनासाठी उत्सुक इतर सर्वांसाठी कमी खर्चात, कमी प्रयत्नात जास्त ज्ञान कसे मिळवता येईल यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZQHBC
Similar Posts
एडिसन थॉमस अल्वा एडिसन हे नाव ऐकले की बल्ब, टेलीग्राफ, फोनोग्राफ, चित्रपट अशा अनेक गोष्टी आठवतात, ज्यांच्याशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. एक हजार ९३ पेटंट त्यांनी मिळवली होती, अशी माहिती देऊन थोर वैज्ञानिक व अमेरिकेचे लोकनायक ठरलेल्या एडिसन यांच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न 'एडिसन अदृश्य नियमांचा ज्ञाता'मधून केला आहे
ज्ञानसुधा आपण जीवनात अनेक गोष्टी करीत असतो. वाचन, मनन करीत असतो पण ते का करावे, व त्या मागील हेतू, त्याचे महत्व बहुतेक वेळा माहीत नसते. अगदी रोज प्रार्थना का करावी खरे संन्यासी जीवन कसे असते. चांगले मन, वर्णमाला, अध्यात्म क्षेत्रातील तीनाचे महत्व, लग्नविधी, तत्पपदी, आलिंगनाचे महत्व, हनुमान, बालाजी यांचे महात्म्य,
सूरबाला आयुष्यात अनेकांशी परिचय होत असतो. काही जणांशी चांगली मैत्री होते. तर काहींचा थोड्या काळासाठी सहवास घडतो. अशा संबंधावर आधारित 'सुरबाला' हा कथासंग्रह सुभाष मुरलीधार कर्णिक यांनी लिहिला आहे. यातील 'शाली' ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. बिनधास्त, फटकळ शालीची खूप वर्षांनी भेट झाल्यावर तिचे मनोहारी भावविश्व,
समय नियोजनाचे नियम जे कार्य आज करता येण्याजोगे आहे, ते उद्यावर ढकलू नाक, असे बेंजामिन फ्रँकलिन यांनी म्हटले होते. वेळेचे हेच महत्व या पुस्तकातून पटवून देण्यात आल आहे. वेळेचा उपयोग कसा करायचा हे सांगून वेळ कुठे व्यर्थ जातो, याचा शोध घेण्याचा सल्ला या पुस्तकात दिला आहे. कामावर लक्ष केंद्रित कसे करायचे, कार्याची योग्य निवड

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language